केम येथील माजी ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव जाधव यांचे निधन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – केम (ता.करमाळा) येथील माजी ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव शंकर जाधव यांचे काल ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ९१ होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांनी करमाळा तालुक्यातील वरकूटे पाथुर्डी ,घोटी या गावात २६ वर्ष ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवा केली होती. केम येथील पत्रकार संजय जाधव यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाने केम व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


