डॉ.आंबेडकर सामाजिक विकास योजनेतुन करमाळा तालुक्यातील ६० गावांसाठी निधी मंजूर - Saptahik Sandesh

डॉ.आंबेडकर सामाजिक विकास योजनेतुन करमाळा तालुक्यातील ६० गावांसाठी निधी मंजूर

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सन २०२३-२४ या वर्षासाठी करमाळा तालुक्यातील ६० गावांतील अनुसूचित जमाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध गावांतील परिशिष्ट “अ “
मधील कामांना व त्या वितरीत करण्यात येणा-या ३०% निधीला मंजूरी समाज कल्याण विभागाकडून देण्यात आलेली आहे अशी माहिती आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडून देण्यात आली.

यामध्ये करमाळा तालुक्यातील सुमारे ६० गावातील, रस्ता सिमेंट काँक्रीट करणे, गटार बांधणे,वॉल कंपाऊड बांधणे, सभा मंडप बांधणे,बौद्ध विहार, पेव्हर ब्लॉक बसविणे आदी कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये खालील गावे व कामे यांना ३०% निधी मंजूर झालेला असून त्यासाठी कामाचा आराखडा, नकाशे, अंदाजपत्रक तयार करून जिल्हाधिकारी यांना सादर केले जाणार आहेत. या कामांना कामाच्या स्वरूपानुसार एकूण ५ लाख ते १० लाख निधी मंजूर असून सध्या ३०% म्हणजेच १.२० लाख ते ३ लाख निधी मंजूर केलेला आहे. उर्वरित निधी नंतर मंजूर होणार आहे.

आपल्या गावातील जे कोणतेही काम मंजूर असेल त्या कामाचे अंदाजपत्रक बनवण्यासाठी आवश्यक असलेले ग्रामपंचायतीची कागदपत्रे संबंधित विभागाच्या अभियंताकडे तात्काळ जमा करण्यात यावे. त्याचबरोबर त्वरित हे काम पूर्ण करून घ्यावीत. काही ठिकाणी आमदार फंडातली काम मंजूर आहेत त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आपण संबंधित अभियंताकडे तात्काळ जमा करावी. याशिवाय अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मतदारसंघांमध्ये निधी येणार आहे त्यासाठी ही कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे .जेणेकरून पुढील येणारी कामे वेळेत पूर्ण होतील.

सुजीत बागल, मांगी ग्रामपंचायत सदस्य (शिंदे गट)
  • खाली मंजूर कामांची यादी तसेच मंजूर निधीची माहिती दिली आहे.
  • म्हसेवाडी येथे भास्कर पवार घर जोड रस्ता सिमेंट काँक्रीट करणे ता. करमाळा
  • बिटरगाव वांगी मागासवर्गीय वसाहत येथे रस्ता सितेट काँक्रीट करणे/गटार बांधणे ता. करमाळा
  • शेलगाव क येथे बौदध विहार बांधणे. ता. करमाळा
  • भाळवणी साठे नगर येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे/गटार बांधणे ता. करमाळा
  • पुनवर दलितवस्ती येथील समाज मंदीर ते वेताळसाहेब मंदीर रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. ता. करमाळा
  • देलवाडी चव्हाण वस्ती येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे/गटार बांधणे ता. करमाळा
  • देवळाली दामोदरे वस्ती येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे /गटार बांधणे. ता. करमाळा
  • घोटी चांभारवडा येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे/ गटार बांधणे. ता. करमाळा
  • गुळसडी ढावरे वस्ती येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे/ गटार बांधणे ता. करमाळा
  • मांगी मरीमाता मंदीर समोर सभामंडप बांधणे ता. करमाळा
  • हिवरवाडी हरीजन वस्ती येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. ता. करमाळा
  • हिवरे दलीतवस्ती येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे/ गटार बाधणे ता. करमाळा
  • हिसरे चांभारवरती येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. ता. करमाळा
  • हिंगणी गावठाण येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे /गटार बाधणे ता. करमाळा
  • जातेगाव बौद्धविहार येथे वॉल कंपाऊड बांधणे ता. करमाळा
  • जिंती सिद्धार्थनगर येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे /गटार बाधणे ता. करमाळा
  • कुंभारगाव झोपडपट्टी येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे /गटार बाधणे ता. करमाळा
  • केडगाव मस्तुद वस्ती येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे/ गटार बाधणे ता. करमाळा
  • पारेवाडी-बौद्धविहार-तांडा वस्ती येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे /गटार बाधणे ता. करमाळा
  • भोसे लहुजीनगर येथे भूमीगत गटार बाधणे ता. करमाळा
  • गुळसडी प्रवेशद्वार ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर पर्यंत रस्ता सिनेंट काँक्रीट करणे. ता. करमाळा
  • केतुर नंबर २ भैरवनाथ नगर येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे/ गटार बाधणे ता. करमाळा
  • कंदर मरीमाई नगर येथे रस्ता सिमेंट कॉक्रीट करणे/ गटार बाधणे ता. करमाळा
  • कामोणे सुंदरदास भालेराव यांचे घर ते बबन भालेराव घर रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. ता. करमाळा
  • कोळगाव दलित वस्ती येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. ता. करमाळा
  • कोर्टी रोहिदास नगर येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे ता. करमाळा
  • खडकी ते नाक टिळक वस्ती रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. ता. करमाळा
  • लिंबेवाडी साबळे वस्ती येथे रस्ता सिमेंट कॉक्रीट करणे. ता. करमाळा
  • मोरवड दिवटे वस्ती येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे ता. करमाळा
  • निमगाव निळवस्ती झोपडपट्टी येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे ता. करमाळा
  • नेरले भीमनगर येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. ता. करमाळा
  • पोफळज कांबळे वस्ती येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. ता. करमाळा
  • पोटेगाव दलित वस्ती येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. ता. करमाळा
  • पांडे भोसले वस्ती येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. ता. करमाळा
  • पांगरे चांभार वस्ती येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. ता. करमाळा
  • रोशेवाडी हरिजन वस्ती येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे ता. करमाळा
  • तरडगाव दलित वस्ती येथे पेव्हर ब्लॉक बसविणे, ता. करमाळा
  • शेटफळ हरिजन वस्ती येथे रस्ता सिमेंट कॉक्रीट करणे. ता. करमाळा
  • साडे इंदिरानगर येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. ता. करमाळा
  • सालसे दलित वस्ती येथे पेव्हर ब्लॉक बसविणे. ता. करमाळा
  • सोगाव रोहिदास नगर येथे रस्ता सिमेंट कॉक्रीट करणे ता. करमाळा
  • सांगवी दलित वस्ती सांगवी नंबर २ येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे ता. करमाळा
  • उमरड कदम शिंदे वस्ती येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे ता. करमाळा
  • उंदरगाव येथे उंदरगाव कांबळे वस्ती क्रमांक दोन येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. ता. करमाळा
  • विहाळ मांगवाडा येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे, ता. करमाळा
  • वीट अण्णाभाऊ साठे नगर येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. ता. करमाळा
  • वांगी नं. ३ चांभार वस्ती येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. ता. करमाळा
  • झरे मातंग वस्ती येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. ता. करमाळा
  • वाशिंबे, केतुर सेगांव रस्ता ते गौतम रदवे घर रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. ता. करमाळा
  • सौंदे दलित वस्ती मनेहर खरात घराशेजारी पेव्हर ब्लॉक बसविणे. ता. करमाळा
  • अर्जुननगर मरिआई मंदिर फकीर चांदेणे घर सिमेंट काँक्रीट करणे. ता. करमाळा
  • वटकटणे मातंगवस्ती ते भैरवनाथ मंदिर रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. ता. करमाळा
  • तरटगांव सुग्रीव समिंदर घर ते करमाळा तरडगांव रस्ता सिमेंट कॉक्रीट करणे. ता. करमाळा
  • रावगांव भीम नगर व रावगांव गावठाण येथे पेव्हर ब्लॉक बसविणे व भूमीगत गटार बांधणे. ता. करमाळा
  • चिखलठाण नं. १ हरिजन वस्ती समाज मंदिर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे. ता. करमाळा
  • कात्रज येथे पांडुरंग रंदवे घर ते भीमराव रंदवे घर रस्ता सिमेंट काँक्रीट करणे गटार बाधणे ता. करमाळा
  • अंजनडोह हरिजन वस्ती येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. ता. करमाळा
  • आवाटी भीम नगर येथे बंदिस्त गटार करणे. ता. करमाळा
  • आळसुंदे वेताळ वस्ती येथे बंदिस्त गटार बाधणे. ता. करमाळा
  • आळजापुर चांभार वस्ती येथे रस्ता सिमेंट काँक्रीट करणे ता. करमाळा

संपादन – सुरज हिरडे

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!