दहावीच्या निकालात केममधील विविध शाळेतील विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी

केम(संजय जाधव): केम व परिसरातील विविध माध्यमिक विद्यालयांचे इयत्ता दहावीचे निकाल जाहीर झाले असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. अनेक विद्यालयांचा निकाल ८५ ते ९३ टक्क्यांपर्यंत लागला असून गुणवंत विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवत शाळेच्या शैक्षणिक परंपरेत भर घातली आहे.

उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयाचा निकाल 82.14 टक्के

केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 82.14 टक्के लागला आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
प्रथम क्रमांक शुभम तुकाराम तळेकर यांनी 92.20 टक्के गुण मिळविले. द्वितीय क्रमांक भार्गव योगेश्वर भिस्ते यांनी 92.00 टक्के गुण मिळविले, तर तृतीय क्रमांक रोशनी रोहिदास मुटेकर यांनी 90.40 टक्के गुण प्राप्त केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक एम. डी. बेले, शालेय व्यवस्थापन समिती, प्राध्यापक व वर्ग शिक्षक यांनी अभिनंदन केले.

राजाभाऊ तळेकर विद्यालयाचा निकाल 91 टक्के

मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत राजाभाऊ तळेकर विद्यालयाचा निकाल 91 टक्के लागला आहे. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविले.
प्रथम क्रमांक सौरभ दत्तात्रय मोरे यांनी 88 टक्के गुणांसह मिळविला. द्वितीय क्रमांक गायत्री शिवाजी मोरे यांनी 86.40 टक्के गुण मिळवून पटकाविला, तर तृतीय क्रमांक श्रेया प्रदीप येवले यांनी 86.20 टक्के गुण मिळविले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष महेश शिवाजी तळेकर, मुख्याध्यापक मनोज तळेकर, शिवाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नागनाथ तळेकर तसेच शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले.

नूतन माध्यमिक विद्यालयाचा निकाल 85 टक्के

केम येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 85 टक्के लागला आहे. विद्यालयातील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
विजया अजय गोडगे यांनी 82.00 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. प्रतिक्षा कृष्णा तळेकर यांनी 79.60 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला, तर ईश्वरी जितेंद्र वासकर यांनी 75.40 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक सुदर्शन तळेकर, प्राचार्या ताकमोगे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
नूतन विद्यालयाची इयत्ता बारावीच्या निकालात शंभर टक्के निकालाची परंपरा कायम असताना, यंदा इयत्ता दहावीचा निकाल अपेक्षेपेक्षा कमी लागल्याने पालकांमध्ये चर्चा सुरू आहे.
छत्रपती संभाजी विद्यालयाचा निकाल 93 टक्के

करमाळा तालुक्यातील निंभोरे येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 93 टक्के लागला आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
प्रथम क्रमांक स्नेहा सचीन पवार यांनी 85.60 टक्के गुणांसह मिळविला. द्वितीय क्रमांक शिवराज भाऊसाहेब वळेकर यांनी 85.20 टक्के गुण मिळविले, तर तृतीय क्रमांक आदित्य सचिन कांबळे यांनी 84.80 टक्के गुण प्राप्त केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अरुण मळेकर, मुख्याध्यापक एस. जे. व्यवहारे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.


