अखिल भारतीय काँग्रेस आय पक्षाचा 28 डिसेंबर रोजी 137 वा वर्धापन दिन वाशिंबे येथे साजरा..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : अखिल भारतीय काँग्रेस आय पक्षाचा 28 डिसेंबर 2022 रोजी 137 वा वर्धापन दिन झेंडावंदन करुन वाशिंबे येथे सकाळी 9-30 वाजता साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदासबप्पा झोळ उपस्थित होते. काँग्रेस आय पक्षाचे ओ.बी.सी.विभागाचे तालुकाध्यक्ष गफुरभाई शेख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. झेंडावंदन झाल्यानंतर राष्ट्रगीताचे गायन झाले, त्यानंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमासाठी कांतीलाल झोळ (चेअरमन वि.का.सेवा.सोसायटी) महादेव झोळ, जगन्नाथ जगदाळे,ह.भ.प.बाळासाहेब झोळ महाराज,समाधान काळे(N.S.U.I.)तालुकाध्यक्ष, जैनुदीन शेख (तालुका सचिव) दस्तगीर शेख (जि.उपा.अल्पसंख्यांक सेल) , दादा कुदळे ग्रा.पं.सदस्य मोरवड,मच्छिंद्र बप्पा झोळ(माजी सरपंच), अतुल मारकड, बाळासाहेब पाटील, भिमराव ओहोळ,संतोष पोरे,भाऊसाहेब झोळ (जि.उपा.शेतकरी संघटना) सुधीर खाटमोडे(दाजी) सोमनाथ अण्णा झोळ,अमोल भोंग,युवराज झोळ,संभाजी पवार,हरिभाऊ झोळ,कैलास झोळ,आनंद झोळ,धनाजी झोळ ,धनजी जगदाळे आदी उपस्थित होते.