वक्फ सुधारणा विधेयक मागे घ्यावे- मुस्लिम समाजाचे तहसीलदारांकडे निवेदन

करमाळा(दि.१५): वक्फ सुधारणा विधेयक 2025 चा जाहीर निषेध करीत सदरील वक्फ विधेयक त्वरित मागे घेण्यात यावा अशा मागणीचे निवेदन आज करमाळा मुस्लिम समाजाच्या वतीने समाजाचे अध्यक्ष माजी नगरसेवक हाजी अल्ताफ शेठ तांबोळी यांच्या हस्ते मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीमध्ये नायब तहसीलदार लोकरे यांना देण्यात आले.

तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की सदरचा विधेयक हा मुस्लिम समाजाच्या विरोधात असून सदरचा विधेयक घाई गडबडीत पास करून एका समाजाविषयी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय निषेधार्ह आहे केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय भारत देशात राहणाऱ्या जवळपास 30 ते 35 कोटी मुस्लिम समाजाच्या हिताच्या विरोधात असून आम्ही या विधेयकाचा तीव्र निषेध करीत आहोत सदरील विधेयक व त्यातील तरतुदी ह्या संविधानाच्या कलम 21 25 व 30 या तरतुदीचे सरासर उल्लंघन करीत असून देशात राहणाऱ्या नागरिकांच्या धर्म स्वतंत्र व मूलभूत अधिकारावरच गदा आणत आहेत असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी अमीर तांबोळी, अमीन बेग, अतिक बेग, मुस्ताक शेख, बिलाल मदारी, दस्तगीर मदारी, उमर मदारी, नजीर मदारी, समीर शेख, असीम बेग, अफरोज पठाण, तसेच जुबेर मिर्झा आदि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते



