पुनवर रस्त्यावरील धोकादायक पुलावरुन मोटारसायकलसहीत खाली पडून ऊसतोड कामगाराचा जागीच मृत्यू - एकजण गंभीर जखमी - Saptahik Sandesh

पुनवर रस्त्यावरील धोकादायक पुलावरुन मोटारसायकलसहीत खाली पडून ऊसतोड कामगाराचा जागीच मृत्यू – एकजण गंभीर जखमी

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : मांगी (ता.करमाळा) येथून पुनवरकडे मोटारसायकलवरुन निघालेल्या दोन ऊसतोड कामगारांचा आज (ता.२९) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला असून, या अपघातात ऊसतोड कामगाराचा रस्त्यावर पुलाचा अंदाज न आल्यामुळे मोटरसायकलसहीत त्या पुलावरुन खाली पडल्यामुळे डोक्याला जबर मार लागून जागीच मृत्यू झाला आहे. त्यासोबत असलेल्या व्यक्ती मात्र गंभीर जखमी आहे.

अपघात झालेल्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते, या अपघातातील जखमी व्यक्तीला तातडीने ॲम्बुलन्समध्ये हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे, हे ऊसतोड कामगार हे मध्यप्रदेश येथून ऊस टोळी सोबत आलेले असल्याचे समजले आहे. या अपघाताची माहिती समजताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमीला मदत केली.

मांगी येथून वडगाव तसेच पुनवरला जाणाऱ्या रस्त्यावर तलावाचा डावा कॅनॉल तेथून जातो, यावरती छोटासा पूल बांधण्यात आलेला आहे, परंतु त्या पुलावरती कठडे किंवा संरक्षक भिंत नाही, त्यामुळे या मोटारसायकलस्वारांना पुलाचा अंदाज न आल्याने ते पुलावरून खाली पडले त्यातच एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे, करमाळा पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
%d bloggers like this: