जलद गतीने गणिते सोडवण्यासाठी अबॅकसचे शिक्षण उपयोगी - डॉ.पवार - Saptahik Sandesh

जलद गतीने गणिते सोडवण्यासाठी अबॅकसचे शिक्षण उपयोगी – डॉ.पवार

केम(संजय जाधव) : आजचे युग स्पर्धेचे आहे. जलद गतीने गणिते सोडवण्यासाठी अबॅकसचे शिक्षण उपयोगी ठरते असे प्रतिपादन डॉ. भगवंत पवार यांनी केम ता. करमाळा येथील अबॅकस क्लासेस च्या उदघाटन प्रसंगी केले. डॉ.पवार हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते वडशिवणे येथील असून सध्या हैद्राबाद येथील एम्स कॉलेजमध्ये त्यांचे एमबीबीएसचे शिक्षण सुरु आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते दिलीप दादा तळेकर होते. सुरुवातीला यावेळी व्यासपीठावर गोसेवक परमेश्वर तळेकर, राहुल पारखे, सरपंच सौ. सारिका कोरे, गणेश पवार आदी उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या क्लासेसच्या संचालिका सौ. सोनल गौरव कुलकर्णी यांनी या क्लासेसची माहिती सांगितली. या स्पर्धेच्या युगात आपल्या मुलाने स्मार्ट असावे असे प्रत्येक पालकांना वाटते. त्यांना आपल्या मुलांना स्मार्टअस अबॅकस शिक्षण फायदेशीर ठरते. यावेळी डेमो पण करून दाखविला.

पवार पुढे बोलताना म्हणाले अबॅकस शिक्षण जलद गतीने गणित सोडवताना खूप उपयोगी ठरते. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा. मुलांच्या आवडीनुसार पालकांनी सुप्प्रत करावा. असे आवाहन त्यांनी केले. यावेळी दिलीप दादा तळेकर म्हणाले की केम हे करमाळा तालुक्यातील शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. गावात 5 माध्यमिक शाळा आहेत. परंतु म्हणावी तशी शैक्षणिक प्रगती नाही. काही शाळेमध्ये राजकारण दिसते. येथील शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडे लक्ष नाही त्यामुळे या शाळेचा पट कमी झाला आहे. इयत्ता 10 वी 12 वी  चे केंद्र केम येथे असल्यामुळे विद्यार्थी कॉपी करतात हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. यासाठी पालकांनी याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे व अबॅकस चे शिक्षण घ्यावे.

यावेळी गणेश पवार, सचिन बीचीतकर यांची भाषणे झाली. यावेळी तलाठी आदलिंगे, माजी सरपंच अजितदादा तळेकर, सामाजिक कार्यकर्ते राहुल आबा कोरे समीर दादा तळेकर, मधू नाना तळेकर, दत्ता भाऊ तळेकर, तलाठी समाधान भुजबळ, निखिल कांबळे, नवनाथ सरडे, चेअरमन सुदर्शन तळेकर, व्होटकर गुरुजी, सावंत गुरुजी, भुजंग भाऊ तळेकर, प्रा. बिचीतकर, जाधव सर, डॉ. जांभळे, डॉ. सुरवसे,  दत्तात्रय कुलकर्णी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार  संजय जाधव व प्रा. सावंत सर यांनी केले. तर आभार गौरव कुलकर्णी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!