खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर क्रीडा संकुल व आधुनिक व्यायाम शाळेचे झाले उद्घाटन

करमाळा(दि.२) : श्री देवीचामाळ येथील खंडोबा मंदिराच्या पाठीमागे भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर क्रीडा संकुल व आधुनिक व्यायाम शाळेचे उद्घाटन करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या हस्ते संपन्न झाले. गुढीपाडव्याच्या दिवशी(दि. ३०) हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमासाठी तालुक्यातील महाराष्ट्र केसरी,उपमहाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र चॅम्पियन तसेच इतर पैलवान व जेष्ठ वस्ताद मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की आमचे सहकारी मित्र अफसर तात्या जाधव यांच्या माध्यमातून आम्ही आमचे प्रेरणास्थान माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब यांच्या नावाने क्रीडा संकुल व आधुनिक व्यायाम शाळा तालुक्यातील मल्लांना उपलब्ध करून दिलेली असून या क्रीडा संकुलामध्ये आम्ही सर्व सोयी सुविधा देऊन उत्कृष्ट असे मल्ल घडवू असे सांगितले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगितले की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर क्रीडा संकुल हे तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक आदर्श क्रीडा संकुल म्हणून भविष्यामध्ये नावारूपाला आलेले दिसेल. या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून गणेश चिवटे व पैलवान अफसर जाधव यांनी उभारलेल्या संकुलाला तालुक्यातील मल्लांनी प्रतिसाद द्यावा. कोणत्याही प्रकारचे व्यसन न करता एक आदर्श व निरोगी पैलवान घडावेत व भविष्यात करमाळा तालुक्यातील मल्ल महाराष्ट्र केसरी सारख्या गदेचे मानकरी व्हावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र केसरी चंद्रहासबापू निमगिरे, भाजपा तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे , शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल,माजी नगराध्यक्ष कन्हैयालाल देवी, पै.सुनील सावंत, पै.अनिल फाटके, माजी उपनगराध्यक्ष सोमनाथ चिवटे , वस्ताद जालिंदर जाधव, आदमभाई शेख,आजिनाथ कोळेकर , देवराव चौधरी,मारुतीराव जाधव, भगवानगिरी गोसावी, काकासाहेब सरडे, अभिजीत मुरूमकर, अमोल पवार ,नितीन झिंजाडे ,सोमनाथ घाडगे, लक्ष्मण शेंडगे, मोहन शिंदे, अनिल जाधव, नगरसेवक प्रवीण जाधव, सचिन घोलप, विजय घोलप,विजय लांड, प्रशांत ढाळे , अतुल फंड , दादासाहेब इंदलकर, नानासाहेब मोरे, बंडू शिंदे, विष्णू रणदिवे ,सचिन गायकवाड, जयंत काळे पाटील ,भैय्या गोसावी, हर्षद गाडे यांच्यासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





