करमाळा शहरात हरवलेली कागदपत्रांची पिशवी सापडल्यास परत करण्याचे आवाहन - Saptahik Sandesh

करमाळा शहरात हरवलेली कागदपत्रांची पिशवी सापडल्यास परत करण्याचे आवाहन

केम (संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील वरकटणे येथे राहणारे चंद्रकांत काळे यांची करमाळा शहरात महत्वाच्या कागदपत्रांची पिशवी हरविलेली आहे. या पिशवीमध्ये घरकुल कागदपत्रे, आधारकार्ड, जातीचे दाखले, बँक पासबुक, पोस्टाचे लाल कार्ड, नोटरीची कागदपत्रे व इतर हि काही महत्वाची कागदपत्रे पिशवीमध्ये होती. सदरची पिशवी गडद निळ्या रंगाची असुन, ती पिशवी आकाराने लहान मुलांचे टिफिन ठेवण्यासाठी वापरली जाते त्या आकाराची होती. त्या पिशवीवर फुलांचे नक्षीकाम आहे. कृपया शहर किंवा तालुक्यातील कोणत्याही इसमास सदरच्या पिशवीतील कागदपत्रे मिळाल्यास खालील नंबरवर संपर्क साधावा. नारायण काळे- मो. नं.9834751667, दशरथ काळे मो. नं.- 7057343264 तरी कागदपत्रे आणुन देणाऱ्या इसमास वरील व्यक्तीकडून स्वखुशीने १०००रु.चे बक्षीस देण्यात येईल. कृपया तालुका व शहरातील कोणत्याही इसमाने वरील कागदपत्रे सापडल्यास, दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. वरील प्रत्येक कागद शासकिय कार्यालयातुन जमा करण्यासाठी बराच वेळ गेला असल्यामुळे, कृपा करुन कागदपत्रे मिळाल्यास संपर्क साधावा. हि काळे यांनी विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!