उर्दू शाळा येथे भारतरत्न डॉ कलाम फाऊंडेशन व सकल मुस्लीम समाजच्यावतीने ज्ञानज्योती फातिमाबी यांची जयंती साजरी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा शहरातील कै नामदेवराव जगताप उर्दू शाळा येथे भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने ज्ञानज्योती फातिमाबी यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी करमाळा येथील साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या अंजली श्रीवास्तव आणि बागवान हाॅस्पिटल डॉ.आफ्रीन बागवान यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सौ.श्रीवास्तव व डॉ बागवान यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी मुख्याध्यापक मा.जुबेर जनवाडकर आणि जनवाडकर अन्य शिक्षकवृंद आणि सामाजिक कार्यकर्त्या शहनाज मोमीन. शालेय समितीचे उपाध्यक्ष इकबाल शेख, जमीर सय्यद, रमजान बेग, सुरज शेख, आझाद शेख, दिशान कबीर, फिरोज बेग, कलंदर शेख,मुस्तकीम पठाण, जावेद सय्यद,कलीम शेख, चांद बेग, आलिम खान, अरबाज बेग, उपस्थित होते.




