करमाळ्यात दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न - Saptahik Sandesh

करमाळ्यात दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) -आज (दि.२२ ) पंचायत समिती करमाळा येथे करमाळा तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना ऑनलाइन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

हे वाटप करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुढील दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. – १) सुमन जालिंदर गायकवाड(शेलगाव वांगी) २)दादा पदरी पोळ, (शेलगाव वांगी), ३)स्वाती महादेव कोळी (शेलगाव वांगी) , ४)रोहित दशरथ जाधव ( जेऊर).

याचप्रमाणे प्रत्येक वर्षी प्रत्येक गावच्या ग्रामपंचायत मध्ये पाच टक्के अपंग निधी व पेन्शन योजना आदी सरकारी योजनांची माहितीही दिव्यांग बांधवाना देण्यात आली.

यावेळी प्रहार संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष संजय पवळ, करमाळा पंचायत समितीचे उपसभापती दत्ता काका सरडे , करमाळा प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव,नेरले गावचे माजी सरपंच औदंबरराजे भोसले, प्रहारचे कार्यकर्ते, दिव्यांगांचे नातेवाईक आदीजन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!