निंभोरे ते कोंढेज रस्त्यावरील स्थगिती उठवावी - रवींद्र वळेकर यांची आ.संजयमामा शिंदे यांच्याकडे मागणी.. - Saptahik Sandesh

निंभोरे ते कोंढेज रस्त्यावरील स्थगिती उठवावी – रवींद्र वळेकर यांची आ.संजयमामा शिंदे यांच्याकडे मागणी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्यातील कोंढेज ते निंभोरे या रस्त्यासाठी 3 कोटी 32 लाख 50 हजार रुपये निधी मंजूर झालेला होता, परंतु महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर नव्याने आलेल्या सरकारने सर्वच कामावरती स्थगिती दिल्यामुळे सदर काम अद्याप झालेले नाही, या पार्श्वभूमीवर रवींद्र वळेकर यांचे नेतृत्वाखाली निंभोरे ग्रामस्थांनी सदर रस्त्यावरील स्थगिती उठविण्यासंदर्भात आमदार संजयमामा शिंदे यांना निवेदन दिले.

करमाळा तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गांसाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार करमाळा मतदारसंघातील 8 रस्त्यांसाठी 24 कोटी रुपयांची तरतूद महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये झालेली होती. त्यामध्ये पारेवाडी राजुरी अंजनडोह झरे कुंभेज कोंढेज निंभोरे मलवडी दहिवली कनेरगाव वेणेगाव ते रामा क्रमांक 9 ला जोडणारा प्रजिमा क्रमांक 4 (भाग कोंढेज ते निंभोरे) या रस्त्यासाठी 3 कोटी 32 लाख 50 हजार रुपये निधी मंजूर झालेला होता, परंतु महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर नव्याने आलेल्या सरकारने सर्वच कामावरती स्थगिती दिल्यामुळे सदर काम अद्याप झालेले नाही. या पार्श्वभूमीवर युवा नेते रवींद्र वळेकर यांचे नेतृत्वाखाली निंभोरे ग्रामस्थांनी सदर रस्त्यावरील स्थगिती उठविण्यासंदर्भात आमदार संजयमामा शिंदे यांना निवेदन दिले.

या दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, निंभोरे ते कोंढेज हा रस्ता श्री निवृत्ती महाराज यांच्या पालखीचा परतीचा मार्ग आहे .या मार्गासाठी आपण 2021 – 22 चे अर्थसंकल्पामध्ये 3 कोटी 32 लाख 50 हजार एवढी भरघोस निधीची तरतूद केलेली आहे.परंतु मध्यंतरी या कामावरती स्थगिती देण्यात आली . सध्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी या भागात पोहोचल्यामुळे येथे ऊस व केळी या पिकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. सदर रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने खूप धोक्याचा झालेला आहे त्यामुळे सदर कामावर दिलेली स्थगिती उठवणे संदर्भात आपण शासन स्तरावरती तातडीने प्रयत्न करावेत अशी विनंती या निवेदनामध्ये केलेली आहे.

सर्वच कामावरील स्थगिती लवकरच उठणार – आ.संजयमामा शिंदे
नवीन सरकारने अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेल्या ज्या ज्या कामावरती स्थगिती दिलेली आहे, ती स्थगिती लवकरच उठेल अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी याप्रसंगी दिली. डिकसळ पूल तसेच करमाळा शहरातील नव्याने बांधण्यात येणारी नगर परिषदेची इमारत व सांस्कृतिक सभागृह आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या कामावरती दिलेली स्थगिती ही उठलेली आहे. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी या कामावरील स्थगिती निश्चितच उठेल असा विश्वास आमदार संजय मामा शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!