रहदारीस अडथळा करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल अशाप्रकारे ट्रॅक्टर लावून बाजूला जाणाऱ्या ट्रॅक्टरचालकावर पोलीसांनी कारवाई केली आहे. २१ नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता केत्तूर नाका येथे घडला आहे.

या प्रकरणी हवालदार ललित गजेंद्र शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की केत्तूर नाका येथे ट्रॅक्टर एमएच ४५ एडी ४५७३ या क्रमांकाचा ट्रॅक्टर चालक अविनाश रामकिसन गपाट रा. आळजापूर यांनी रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना रहदारीस अडथळा होईल अशा स्थितीत उभा केला. या ट्रॅक्टरच्या मागे ऊसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या होत्या. हा वाहन चालविण्याचा परवाना नसताना मिळून आला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!