करमाळ्यातील शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : करमाळा शहरातील शिवसेनेने ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) या गटाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावर सडकून टिका करत निषेध केला आहे. या निषेधासाठी करमाळा शहरातील छत्रपती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून पुतळ्यासमोर कोश्यारी यांचे पोस्टर लावून त्यांच्यावर सडकून टिका केली आहे.

याप्रसंगी शिवसेनेने जोडो मारो आंदोलन केले. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख सुधाकर लावंड, शहरप्रमुख प्रविण कटारिया, युवा सेना तालुकाप्रमुख शंभुराजे फरतडे, शहरप्रमुख समीर परदेशी, शिवसेना उपशहरप्रमुख पंकज परदेशी, संतोष भालेराव, युवा शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, अभिषेक गुटाळ, नागनाथ घरबुडे, लालू कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी करमाळा पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!