ट्रॅक्टर अपघातात पाच वर्षाचा मुलगा ठार.. - Saptahik Sandesh

ट्रॅक्टर अपघातात पाच वर्षाचा मुलगा ठार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : ट्रॅक्टर अपघातात पाच वर्षाचा मुलगा जखमी होऊन मयत झाला आहे. हा प्रकार १९ नोव्हेंबरला सकाळी साडेदहा वाजता विहाळ येथील भैरवनाथ साखर कारखान्याच्या गव्हाणीजवळ घडला आहे.

या प्रकरणी सुभाष प्रल्हाद पवार (रा. लासूरस्टेशन, ता. गंगापूर, ह. रा. भैरवनाथ कारखाना विहाळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की मी भैरवनाथ कारखान्यावर ऊसाच्या मोळ्या गव्हाणीत टाकण्याचे काम करत आहे. १९ नोव्हेंबरला आम्ही आमचे काम करत असताना माझा मुलगा कृष्णा (वय-५) व सार्थक (वय – ३) हे गव्हाणीजवळ खेळत होते.

यावेळी ट्रॅक्टर चालक क्र. एमएच ४५ एफ ६७७ हा ऊस खाली करण्यासाठी आला व त्या चालकाने निष्काळजीपणाने रिकामा ट्रॅक्टरची मुलगा कृष्णा यास जोराची धडक दिली. त्यास डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराला घेऊन जाण्यापूर्वीच तो मरण पावला आहे. या प्रकरणी पोलीसांनी अनोळखी ट्रॅक्टरचालका विरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!