दारू पिऊन ट्रॅक्टर चालविणाऱ्याविरूध्द कारवाई.. - Saptahik Sandesh

दारू पिऊन ट्रॅक्टर चालविणाऱ्याविरूध्द कारवाई..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातून दारू पिऊन ऊसाने भरलेल्या ट्रॉलीचा ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या चालकाविरूध्द पोलीसांनी कारवाई केली आहे. हा प्रकार १९ नोव्हेंबरला सायंकाळी पावणेआठ वाजता घडला आहे.

यात पोलीस हेडकॉन्स्टेबल ललित गजेंद्र शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की १९ नोव्हेंबरला सायंकाळी पावणेसातच्या सुमारास आम्ही उपविभागीय पोलीस कार्यालय समोर आलो असता, एक ट्रॅक्टर वेडावाकडा अडखळत चालत असल्याचे जाणवले. आम्ही तो ट्रॅक्टर थांबविला. त्यावेळी त्या ट्रॅक्टरवरील चालक सिध्दनाथ मच्छिंद्र तरंगे (वय ५०, रा. भालेवाडी) हा मद्य पिलेला होता.

त्याची वैद्यकिय तपासणी केली असता, तो दारूच्या अंमलाखाली असलेला अभिप्राय मिळालेला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!