८ जानेवारीला राज्यस्तरीय धनगर समाज वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन - Saptahik Sandesh

८ जानेवारीला राज्यस्तरीय धनगर समाज वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : धनगर समाज सेवा संघातर्फे आयोजित १५ वा राज्यस्तरीय धनगर समाजाचा वधू-वर परिचय मेळावा रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत रामकृष्ण मंगल कार्यालय, शिवदत्त नगर (नवी सांगवी),पिंपळे गुरव पुणे या ठिकाणी होणार आहे , अशी माहिती धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष व संस्थापक श्री मुकुंदराव कुचेकर यांनी दिली.

मागील दोन वर्षी कोरोना प्रादुर्भाव काळामुळे हा वधू-वर मेळावा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला होता. यावर्षी मात्र हा वधू वर मेळावा नेहमीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने भव्य व दिव्य स्वरूपात घेण्यात येणार आहे. धनगर समाजातील सर्व पोट जातीमधील धनगर समाज बांधवांनी आपल्या इच्छुक वधू-वरांची नावे १० डिसेंबर २०२२ पर्यंत ९६७३८३६८९८ या व्हाट्सअप नंबर वर नोंदणी करावी.

धनगर समाजातील इच्छुक लोकांनी या मेळाव्यासाठी आपल्या मुलाची/मुलीची नोंदणी लवकरात लवकर करून मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन शहर कार्यकारणी सदस्य संजय सरवदे यांनी केले.

On 8th January State Level Dhangar Samaj organized an introduction meeting on brides

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!