उजनी धरणग्रस्त समितीची पुण्यात बैठक संपन्न – तालुक्यातील धरणग्रस्त समितीने मांडल्या विविध मागण्या..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : उजनी धरणग्रस्त प्रतिनिधींची बैठक पुणे येथील सिंचनभवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे उपस्थित होहोते.

यावेळी एक्झेक्युटिव्ह डायरेक्टर जलसंपदा विभाग श्री कपोले, अधिक्षक अभियंता श्री.धुमाळ व इतर सर्व प्रथम श्रेणी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीस इंदापूर तालुक्यातील तसेच करमाळा तालुक्यातील उजनी धरणग्रस्ताचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी करमाळा तालुक्यातून करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव बंडगर, उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे उपाध्यक्ष भारत साळुंखे, शेतकरी संघटनेचे हनुमंत यादव वांगी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. विठ्ठल शेळके उपस्थित होते. याप्रसंगी करमाळा तालुक्याच्यावतीने प्रा.बंडगर यांनी १) उजनी धरणग्रस्तांना बारमाही पाणी परवाना मिळावा व त्याचे नूतनीकरण करण्यासाठी कॅम्प लावावेत. २) उजनी धरणातून शेतकरी गाळ उचलत असेल तर त्यास जाचक अटी घालू नयेत. ३) संपादित क्षेत्रातील शिल्लक जमिनी शेतकऱ्यांना वहीवाटताना पाणी परवाना व वीज कनेक्शन विनाअट द्यावी त्यासाठी असणारी टेंडर पद्धत रद्द करावी ४) आणि सर्वात महत्त्वाचे महत्त्वाचे म्हणजे उजनी धरणातून कृष्णा मराठवाडा बोगद्याद्वारे जाणारे पाणी हे समुद्रसपाटीपासून 487 मीटरवर न घेता केवळ केवळ उजनी धरण 100% भरल्यानंतरच असणारे जादा पाणी बोगद्यातून सोडावे अशा विविध मागण्या त्यांनी यावेळी मांडल्या.

विविध धरणग्रस्तांच्या हितांच्या मागण्या बैठकीत मांडल्या.यावर एक्झेक्युटिव्ह डायरेक्ट श्री.कपोले यांना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची सूचना केली. या प्रसंगी या सर्व मागण्याचा विचार करून सोडविण्यात येथील असे आश्वासन दिले. बैठकीचे प्रस्ताविक इंदापूर तालुका धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष तथा माजी उपसभापती अंकुश पाडूळे यांनी केले तर आभार भारत साळुंखे यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!