मानव हेळकर यांची नॅशनल डिफेन्स ॲकेडमी (NDA) येथे निवड..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जेऊर येथील रहिवासी प्रशांत रामचंद्र हेळकर यांचे चिरंजीव मानव प्रशांत हेळकर, याची नॅशनल डिफेन्स एकेडमी (एन डी ए) येथे निवड झाली.
या परीक्षाचा निकाल लागला असून, 519 विद्यार्थी यादी जाहीर झाली आहे, यात मानव हेळकर हा 69 वा क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. इयत्ता 6 वी ते 10 पर्यंत त्याचे सैनिक स्कुल, सातारा येथे शिक्षण झाले .पुढील 11 वी 12 शिक्षण एसपीआय , औरंगाबाद येथे झाले. करमाळा तालुक्यात संरक्षण दलात अधिकारी म्हणून झालेली त्याची ही निवड भविष्यात पुढील विद्यार्थ्यांना मागर्दशन नक्कीच करेल. करमाळा तालुक्यातून मानव हेळकर याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.