आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळेच पोफळज येथील विद्यार्थ्यांना एसटी बस सुरु : पांडुरंग शिंदे - Saptahik Sandesh

आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळेच पोफळज येथील विद्यार्थ्यांना एसटी बस सुरु : पांडुरंग शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी:
करमाळा :
पोफळज (ता.करमाळा) येथील शालेय विद्यार्थी कुंभेज येथील माध्यमिक विद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. सदर विद्यार्थ्यांना प्रशालेत जाणे – येणे साठी अडचण होती, ही अडचण दूर करण्याची विनंती आमदार संजयमामा शिंदे यांना केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याशी संपर्क साधून ही अडचण सोडवली असून आमदार संजयमामा यांच्या पाठपुराव्यामुळे ही बस पोफळज येथील विद्यार्थ्यांसाठी सुरु झाली असल्याची माहिती पांडुरंग आबा शिंदे यांनी दिली.

कुंभेज प्रशालेमध्ये सध्या पोपळज तसेच हजारवाडी या भागातून विद्यार्थी शाळेसाठी येत आहेत .त्यांची होणारी गैरसोय या बसमुळे दूर होणार आहे. ही बस सुरू करण्यासाठी पोपळज गावचे उपसरपंच माननीय श्री पांडुरंग (आबा) शिंदे व चेअरमन राजेंद्र पवार तसेच संतोष पोळ, संतोष पवार, बिभीषण गव्हाणे ,संजय पवार ,अक्षय कुलकर्णी ,बलभीम वाघमारे ,मंगेश कांबळे, परमेश्वर पवार ,सागर कांबळे, धनंजय पवार, विलास कांबळे, पोपट कांबळे ,गणपत शिंदे, कैलास सुरवसे, महादेव सुरवसे, सहदेव सुरवसे ,वेताळ पवार ,संतोष गव्हाणे, शिवाजी क्षीरसागर, तसेच इतर पालक यांचे सहकार्य लाभले. ही बस सुरू झाल्याबद्दल पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय कुंभेज येथील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभार मानले . पोफळज येथे या बसची विधिवत पूजा करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

Sonaraj metal and crockery karmala
poflaj | pofalaz | Hazarwadi | MLA Sanjaymama Shinde | bus | Karmala |. Saptahik Sandesh

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!