दहिगाव योजनेचे पाणी तलावात पोहोचले – निंभोरे, लव्हे व कोंढेज गावातील ग्रामस्थांनी केले पाणी पूजन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.२५) : करमाळा तालुक्यातील निंभोरे, लव्हे व कोंढेज या तीनही गावातील तलाव दहिगाव योजनेचे पाणी आल्यानंतर या गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत विठोबा तलावातील पाण्याचे पूजन केले. गावातील पाणीपुरवठा योजना तसेच शेतीसाठी पाण्याचा प्रमुख स्त्रोत असलेला विठोबा तलाव आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार शंभर टक्के भरून दिल्याबद्दल व हे पाणी आवर्तन सुरळीतपणे दिल्याबद्दल आमदार शिंदे यांचे स्वीय सहाय्यक डॉ. विकास वीर ,दहिगाव योजनेचे शाखा अभियंता सोहम कांबळे ,चालक सचिन कोकणे, राष्ट्रवादी पदवीधरचे तालुका अध्यक्ष रवींद्र वळेकर यांचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला.

या तलावातील पाण्याचे पूजन सरपंच रंजनाताई विलास पाटील, सिंधुबाई कवडे मनीषा कवडे, सिंधुबाई बोराडे ,कांताबाई भांगे, राजाबाई भांगे, वैशाली शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले .याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य विलास दादा पाटील, रामभाऊ कवडे ,दीपचंद भांगे, राजाभाऊ भांगे, अधिकराव भांगे, यशवंत भांगे, खंडेराव भांगे, यशवंत शिंदे, हनुमंत कवडे, गंगाराम दगडे, दगडू भांगे, परमेश्वर कवडे, विलास भांगे, दादा भांगे, प्रदीप भांगे, गहिनीनाथ भांगे, राहुल भांगे आदी उपस्थित होते.


