जनजागर सरपंच व सदस्य असोसिएशनच्या तालुकाध्यक्षपदी सरपंच आशिष गायकवाड यांची निवड
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : देवळाली (ता.करमाळा) गावचे सरपंच आशिष गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य जनजागर सरपंच व सदस्य असोसिएशनच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड जनजागर सरपंच व सदस्य असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोटे यांनी नरखेड (ता.मोहोळ) येथे नियुक्तीपत्र देऊन केली.
या झालेल्या निवडीनंतर श्री.गायकवाड म्हणाले की, आपण दिलेल्या पदाचा वापर करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी करणार आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष विकास गरड, सचिव कौसर जागिरदार तसेच मार्गदर्शक कैलास गोरे तसेच देवळाली ग्रामस्थ उपस्थित होते.