...तर राज्यात कॉंग्रेसची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही - प्रतापराव जगताप - Saptahik Sandesh

…तर राज्यात कॉंग्रेसची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही – प्रतापराव जगताप

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.१७) : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत काँग्रेस(आय) पक्षाचे विचार पोहचले तर, काँग्रेस पक्षाची सत्ता राज्यात आल्याशिवाय राहणार नाही असे मत प्रतापराव जगताप यांनी व्यक्त केले. हिंगणी (ता.करमाळा) येथील काँग्रेस पक्षाच्या शाखेच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते.

Yash collection karmala clothes shop

केतुर पंचायत समितीचे काँग्रेस पक्षाचे प्रमुख रामचंद्र जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाखा उद्घाटनाचे नियोजन केले होते. याबाबत पुढे बोलताना श्री.जगताप म्हणाले की , शहरापासुन अगदी टोकाला हिंगणी गाव आहे. या गावातील नागरीकांना कसल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर त्या सोडवण्यास आपण कटीबध्द असुन, स्व.नामदेवरावजी जगताप साहेबांचे विचार आपण सर्वांनी समाजात पेरले पाहिजेत.

S.K. collection bhigwan

येणाऱ्या काळामध्ये तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये शाखा स्थापन करणार असुन काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ पटोलेसाहेब,आ.प्रणितीताई शिंदे,जिल्हाध्यक्ष डाॕ.धवलसिंह मोहीते-पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्याचा मानस असल्याचे श्री. जगताप यांनी सांगुन शाखेचे अध्यक्ष अमोल बाबर,उपाध्यक्ष अंगद बाबर,सचिव अशोक बाबर,सहसचिव शिवाजी बाबर,खजिनदार दादासाहेब बाबर,सहखजिनदार अक्षय तुपे,प्रसिध्दीप्रमुख विनायक बाबर,दिपक बाबर यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Sonaraj metal and crockery karmala

यावेळी तालुका उपाध्यक्ष दादासाहेब पवार तसेच हिंगणी गावातील विष्णु गणपत जाधव,सागर विष्णु मांढरे,अमोल बिभिषण बाबर,शिवाजी रामचंद्र बाबर,अमोल रमेश पाटील,प्रविण तानाजी बाबर,विठ्ठल माणिक गायकवाड,सतार पापाभाई ईमानदार,नवनाथ निवृत्ती बाबर,शिवाजी सुखदेव बाबर,अशोक बाळासाहेब बाबर,तात्यासो जगन्नाथ देवकर,माधव निवृती जाधव,केशव नामदेव बाबर,सचिन अरुण सुरवसे,भाऊसाहेब महादेव गायकवाड,संतोष भानुदास बाबर,नवनाथ रुपचंद शिंदे,नागनाथ दत्तात्रय बाबर,विजय नंदकुमार गुरव,समाधान संजय टाकसर,उमेश रायचंद सर्जे,संतोष रघुनाथ जाधव, किसन गजेंद्र बाबर,रामहरी देवराव बाबर,ज्ञानेश्वर आत्माराम बाबर,बाबासो दादासाहेब जगताप,नामदेव अंबादास बाबर,आदी आदी उपस्थित होते.

Sonali ply and furniture shop karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!