ओव्हर फ्लो आवर्तनापासूनच काटेकोरपणे अंमलबजावणी करा - आ.संजयमामा शिंदे - Saptahik Sandesh

ओव्हर फ्लो आवर्तनापासूनच काटेकोरपणे अंमलबजावणी करा – आ.संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता. १७) : सध्या उजनी धरणामध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे लवकरच ओव्हरफ्लो आवर्तन सुरू करण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना तातडीने करा, दरवर्षी उन्हाळी आवर्तनाला अडचणी येत असतात त्यामुळे या ओव्हर फ्लो आवर्तनापासूनच काटेकोरपणे अंमलबजावणी करा अशा सूचना आमदार संजयमामा शिंदे यांनी दहिगाव योजना सिव्हिल विभागाच्या अधिकारी मंडळींना दिल्या
आहेत.

आमदार श्री.शिंदे यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक…

करमाळा तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदानी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेची आढावा बैठक आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 15 जुलै रोजी आ. संजयमामा शिंदे संपर्क कार्यालय करमाळा येथे संपन्न झाली. या बैठकीसाठी दहिगाव योजना सिव्हिल विभागाचे उपअभियंता अवताडे , शाखा अभियंता कांबळे साहेब, हायड्रो विभागाचे कार्यकारी अभियंता चौकडे, उपअभीयंता तरंगे व मेकॅनिकल विभागाचे उपअभियंता गोरे यांच्याबरोबरच माजी जि. प. सदस्य विलास राऊत, पंचायत समितीचे सदस्य प्रतिनिधी दत्ता जाधव ,स्वीय सहाय्यक डॉ. विकास वीर, प्रवीण शिंदे गुरुजी, सुरज ढेरे आदी उपस्थित होते.

Yash collection karmala clothes shop advertise

या आढावा बैठकीमध्ये दहिगाव योजनेच्या दोन्हीही पंपगृहातील सद्यस्थिती, पंपांची सुरू असलेली कामे व काम पूर्ण होणे बाबतचा कालावधी, निधी बाबतच्या अडचणी या विषयावरती प्रामुख्याने चर्चा झाली. यावेळी बोलताना आ. संजयमामा शिंदे म्हणाले की, सर्व विभागांचा समन्वय साधून योग्य पद्धतीने काम करा. मला रिझल्ट द्या .महावितरण विभाग ,हायड्रो विभाग, मेकॅनिकल विभाग व सिव्हील विभाग या चारही विभागाच्या समन्वयातूनच ही योजना योग्य पद्धतीने चालेल, प्रत्येक विभागाच्या ज्या काही अडचणी असतील त्या वरिष्ठ पातळीवरती सोडवण्यासाठी आपण लवकरच बैठक घेऊ व त्या अडचणी सोडवू. असेही त्यांनी म्हटले आहे.

S.K. collection bhigwan
Sonaraj metal and crockery karmala
Sonali ply and furniture shop karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!