वडशिवणे येथे दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न - Saptahik Sandesh

वडशिवणे येथे दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

केम ( प्रतिनिधी-संजय जाधव) : वडशिवणे (ता. करमाळा) येथील डॉ.भगवंत गणेश पवार यांच्या वतीने गावातील दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते शाल,श्रीफळ, पुस्तक व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान केला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दहावी व बारावी नंतर करिअर विषयी मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रंथालय निरीक्षक प्रदीप गाडे हे होते.यावेळी भैरवनाथ उघडे, ज्ञानेश्वर राऊत,रत्नाकर कदम,कारंडे सर,मोरे सरांनी आपले मनोगत व्यक्त केले.भारत सरकारच्या युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालयामार्फत सुरू असलेल्या नेहरू युवा मंडळाच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी डॉ. भगवंत पवार यांना ‘वडशिवणेरत्न ‘ हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत यांनी जाहीर केले. या कार्यक्रमासाठी वडशिवणे(wadshivane) गावचे मा. सरपंच रत्नाकर कदम,नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत,मा.चेअरमन मारुती कदम,वैजीनाथ कदम,बाळासो वणवे,महारुद्र पवार,महादेव भागवत,सुभाष पवार, सतीश ओस्तवाल उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश पवार यांनी केले तर आभार डॉ. भगवंत पवार (bhagwant pawar) यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!