सालसे येथील कार्यकर्त्यांचा माजी आमदार नारायण पाटील गटात 18 नोव्हेंबर रोजी प्रवेश..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : सालसे येथील कार्यकर्त्यांचा नारायण आबा पाटील गटात 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर प्रवेश होणार आहे, यावेळी माजी आमदार नारायणआबा पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सालसे येथील जवळपास 20 कार्यकर्त्यांचा नारायण आबा पाटील गटात प्रवेश होणार आहे हा कार्यक्रम सालसे येथील शाळेच्या प्रांगणात होणार आहे. 

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे केम चे माजी सरपंच अजित तळेकर, सभापती अतुल पाटील, माजी सभापती शेखर गाडे, पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव, नारायण आबा पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील, महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख, मुंबई महापौर केसरी विजय गुटाळ हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच करमाळा तालुक्यातील घोटी, वरकुटे, शेलगाव, आळसुंदे, फिसरे, हिसरे, गौंडरे, नेरले आवाटी, सालसे, निमगाव या गावचे सरपंच व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!