गझल मंथन साहित्य संस्थेच्या गझलयात्रीचे रविवारी पुण्यात प्रकाशन..

करमाळा / प्रतिनिधी : गझल मंथन साहित्य संस्थेचा ‘गझलयात्री’ या पहिल्या प्रातिनिधिक गझलसंग्रहाचे प्रकाशन आणि निमंत्रित गझलकारांचा भव्य गझल मुशायरा रविवार दि. २० नोव्हेंबर रोजी पुणे येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील नामांकित गझलकार उपस्थित राहणार आहेत.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ गझलकार भूषण कटककर उपस्थित राहतील. सूत्रसंचालन वैशाली माळी करतील. कार्यक्रम दोन सत्रात होईल. पहिल्या सत्रात सकाळी १० ते १२ या वेळेत गझल मुशायरा होईल.

या मुशायऱ्यात गझलकार आर.के. आठवले, डॉ. मंदार खरे, रवींद्र सोनवणे, संदीप जाधव, निलेश शेंबेकर, गोवर्धन मुळक, संजय कुळये डॉ. रेखा ढगे, किरण देशमाने, सरोज चौधरी, शीला टाकळकर, डॉ. रेखा देशमुख, नंदिनी काळे सहभागी होतील. या मुशायऱ्याचे सूत्रसंचालन गझलकार प्रदीप तळेकर करतील. दुपारी १२.१० वाजता गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे हे मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर ‘गझलयात्री’ प्रातिनिधिक गझलसंग्रहाचे प्रकाशन होईल. यानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष म. भा. चव्हाण आणि प्रमुख अतिथि भूषण कटककर मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर दुपारी १२.३० ते १.०० दरम्यान स्नेहभोजन होईल.

दुसऱ्या सत्रात दुपारी १ वाजता गझल मुशायरा होईल. त्यात ज्येष्ठ गझलकार गझलकार म.भा. चव्हाण, भूषण कटककर (बेफिकीर), डॉ. कैलास गायकवाड, प्रमोद खराडे, डॉ. शिवाजी काळे, डॉ. स्नेहल कुलकर्णी, शांताराम खामकर (शाम), बापू दासरी, अभिजीत काळे, अमृता जोशी, भूषण अहीर सहभागी होतील. या मुशायऱ्याचे सूत्रसंचालन गझलकार दिनेश भोसले करतील. हा कार्यक्रम “निवारा” ९६, नवी पेठ, ठोसरपागा, अलका टॉकीज जवळ, एस. एम. जोशी सभागृहा समोर, पुणे येथे होणार आहे.

तरी गझल रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, सहसचिव उमा पाटील, प्रसिद्धी प्रमुख भरत माळी, पुणे जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष बा. ह. मगदूम, पुणे विभागीय सचिव प्रदीप तळेकर, उपाध्यक्षा डाॅ. विजया नवले, सचिव डॉ. रेखा देशमुख, सहसचिव नंदिनी काळे, कोषाध्यक्षा रेखा कुलकर्णी, संयोजक (शहर विभाग) स्वाती लोहकरे, संयोजक (ग्रामीण विभाग) सरिता कलढोणे व जिल्हा कार्यकारिणीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!