'यशकल्याणी' संस्थेच्यावतीने चिखलठाणच्या इरा पब्लिक स्कूलला स्मार्ट टी.व्ही.भेट - Saptahik Sandesh

‘यशकल्याणी’ संस्थेच्यावतीने चिखलठाणच्या इरा पब्लिक स्कूलला स्मार्ट टी.व्ही.भेट

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : चिखलठाण (ता.करमाळा) येथील इरा पब्लिक स्कूलयशकल्याणी सेवाभावी संस्थेच्यावतीने प्रा.गणेशभाऊ करे- पाटील यांच्या हस्ते इरा पब्लिक स्कूल चिखलठाण, या शाळेला स्मार्ट टी.व्ही. सेट भेट देण्यात आला. स्कूलच्यावतीने विद्यार्थ्यांनी या भेटीचा स्विकार केला.

यावेळी गणेशभाऊ करे-पाटील यांचा सत्कार संस्थेचे सचिव सुनिल अवसरे यांनी केला. यावेळी डॉ.ब्रिजेश बारकुंड यांनी श्री.करे-पाटील यांच्या सामाजिक कार्याबद्दलची माहिती विद्यार्थ्याना सांगितली. गणेश करे-पाटील यांनी इरा पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांची प्रगती व शाळेबद्दल कौतुक केले व शाळेला मदतीबाबत आश्वासन दिले.
याप्रसंगी स्कूलचे मुख्याध्यापक श्री कसबे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!