सत्यास वाव नाही..! (कविता)

मैफिल चोरांची सज्जनास वाव नाही
दुनियेत तेच कारभारी सत्यास वाव नाही !!
निवडणुक जिंकणे त्यांना अवघड नाही
नीतीची त्या॑ना अंशानेही चाड नाही !!
तेच देतात प्रवचने वागावे कसे
त्यांचीच पाउले उलटी लाज बाळगतात कोठे ?!!
रक्तपिपासू जलवा जागोजागी पर्याय नाही
संविधानाचा पंचनामा कोणास विधीनिषेध नाही !!
महात्मे उरले ते उत्सवापुरते फ़िकिर नाही
आपल्याच पोळीवर तूप इतरांचा विचार नाही !!
सत्कार सन्मान यांचेच ते हक्कदार
खुर्चीचे वारस त्यांचेच वारसदार!!
सामान्य जगतात केवळ मृत्यू
येतं नाही म्हणून
निरढावलेले सारेच श्रमीकाना
स्थान नाही !!
- – आनंद कोठडीया,९४०४६९२२००