देश म्हणतो बसवा पुतळा
देश झाला विचारांनी खुळा
म्हणतो बसवा पुतळा
देश झाला मनगटानी लुळा
म्हणतो बसवा पुतळा
कुपोषण बालक दुधकुळा
देश म्हणतो बसवा पुतळा
समान न्याय नाही येथे
विशिष्ट समाजाचे उभे होतात पुतळे जेथे
गोरे इंगम होते न्यायी
इथले राजकारणी कसाई
दुष्काळाने बळीराजाचा सुकला मळा
देश म्हणतो बसवा पुतळा
त्या महापुरुषांना नव्हत हे अभिप्रेत
पुतळा घोटाळ्याची निघू शकते पत्रिका श्वेत
पुतळ्यात विचार सामावले
पुतळे उभारून तेच महापुरुष गमावले
स्वातंत्र्यानंतर फक्त पुतळे कमावले
फक्त पुतळे कमावले
कवी – अतुल ठाकर, जेऊर, ता. करमाळा ( मो.९२८४१७३८३२)