वरकटणे येथे उद्या 4 जानेवारीला 'राजेरावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी' कार्यालयाचे उद्घाटन.. - Saptahik Sandesh

वरकटणे येथे उद्या 4 जानेवारीला ‘राजेरावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी’ कार्यालयाचे उद्घाटन..


करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या कार्यालयाचे उद्या 4 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता वरकटणे येथे उद्घाटन होत असून, यासाठी उद्घाटक म्हणून वॉटर या संस्थेचे जिल्हा समन्वयक कांतीलाल गीते उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नितीन शेळके (जिल्हा विकास व्यवस्थापक राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड, सोलापूर) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

यावेळी यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे ,तहसीलदार समीर माने, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे ,गटविकास अधिकारी मनोज राऊत ,सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरी ,वॉटर संस्थेच्या सामाजिक विकास अधिकारी समीना पठाण, विजय पाटील ,पाणी फाउंडेशन चे तालुका समन्वयक प्रत्येक गुरव , वरकटनेचे सरपंच सौ वैजयंता घोरपडे ,आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन तात्यासाहेब मस्कर, सोसायटीचे चेअरमन शरद देवकर हे मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त शेतकरी सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी लिमिटेड करमाळा यांच्यावतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!