खांबेवाडी येथे आमदार विकास निधीतून हनुमान मंदीरासमोर सभामंडप कामाचे भूमिपूजन.. - Saptahik Sandesh

खांबेवाडी येथे आमदार विकास निधीतून हनुमान मंदीरासमोर सभामंडप कामाचे भूमिपूजन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : खांबेवाडी (ता.करमाळा) येथे आमदार स्थानिक विकास निधीतून हनुमान मंदीरासमोर सभामंडप बांधणे कामाचे भूमिपूजन माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते व विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी शंभूराजे जगताप,लव्हे गावचे सरपंच मा.विलासदादा पाटील,वाशिंबे गावचे नवनिर्वाचित सरपंच मा.तानाजीबापू झोळ,पांडे गावच्या सरपंच मा.सौ.अनिताताई मोटे, वाघाची वाडी गावचे सरपंच मा.दविदास आण्णा वाघ,पोपळज गावचे चेअरमन मा.राजेंद्र पवार,मा.सुजिततात्या बागल, बोरगाव गावचे सरपंच मा.विनय ननवरे,मा.डॉ.राहुल कोळेकर,मा.शहाजी झिंजाडे,पै.अनिल पवार,पै.शिवाजी नरुटे,मा.युवराज गपाट,मा.दादा वायकुळे,मा.विजय कोळेकर,मा.देवकर रावसाहेब व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!