आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी बारामती मध्ये ‘कृषिक २०२३’ प्रदर्शन सुरू

करमाळा : ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, (बारामती), कृषि विज्ञान केंद्र, कृषि महाविद्यालय, अटल इन्क्युबेशन सेंटर, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ लंडन यांच्यावतीने बारामती (माळेगाव) येथे देशातील सर्वांत मोठे कृषि प्रात्यक्षिकांवर आधारीत ‘कृषिक २०२३’ हे कृषी प्रदर्शन १९ जानेवारी पासून सुरु झाले असून २३ जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन सुरू असणार आहे.

यामध्ये बी-बियाणे, खते, किड व रोग नियंत्रण यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. तसंच शेतकऱ्यांना Artificial Intelligence, Vertical Farming, Urban Farming, रोबोटचा शेतीतील वापर, फळप्रक्रिया क्षेत्रातील तंत्रज्ञान,दूध व भाजीपाला प्रक्रिया उदयोग, मिलेट दालन, Natural Farming अशा अनेक नाविण्यपूर्ण गोष्टी या प्रदर्शनात २३ जानेवारीपर्यंत पाहता येणार आहे. कृषि क्षेत्रातील सकारात्मक बदलासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.