करमाळ्याच्या भरबाजारात चितुरपक्षाची विक्री – प्रशासनाने दुर्लक्ष..

करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.20) : करमाळा शहरात बाजारदिवशी भरबाजारपेठेत चितूरपक्षाची खुलेआम विक्री झाली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षीतपणामुळे हे प्रकार होत आहेत. याची खंत पक्षीप्रेमींनी व्यक्त केली आहे.

करमाळा येथील बाजार शुक्रवारी असतो, हे लक्षात घेऊन बाहेरील व्यक्तीने शेकडो चितूर पक्षी विक्रीसाठी आणले होते. 250 रूपयाला जोडी विकली जात होती. या पक्षाचे मांस खाल्याने वातीचे विकार बरे होतात, गुडगेदुःखी थांबते असे समज असल्याने अनेक लोक चितूरपक्षाचे मांस खाण्यासाठी खरेदी करतात. आज भर बाजारात हा विक्रेता अडीशे रूपयेला जोडी असे ओरडून विक्री करत होता.
राखी चित्तर हा चतुर या स्थानिक नावाने ओळखला जाणारा गवताळ जमीन, माळरान परीसरात आढळणारा तृणबीज तसेच शेत धान्य पिकातील कीटक खाणारा शेतकरी मित्र पक्षी आहे. परंतू शिकाऱ्यांकडून मोठया प्रमाणात शिकार होत असल्याने नजिकच्या काळात हा पक्षी संकटग्रस्त म्हणून गणला जाईल. स्थानिक व्यक्तींना असे चोरटी शिकार करणारे आढळल्यास वन विभागाशी तात्काळ संपर्क करून माहिती कळवावी विभागाने यावर अंकुश ठेवणे आवश्यक आहे. या पक्ष्याची खुलेआम विक्री होत असेल तर हे चिंताजनक आहे.
– कल्याणराव साळुंके पक्षीमित्र करमाळा
