मुस्लिम बांधव विविध संघटनेच्यावतीने श्री कमलादेवी मंदिरात भाविकांना केळी व महाप्रसादाचे वाटप ‌‌ - Saptahik Sandesh

मुस्लिम बांधव विविध संघटनेच्यावतीने श्री कमलादेवी मंदिरात भाविकांना केळी व महाप्रसादाचे वाटप ‌‌

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : शारदीय नवरात्रौत्सवच्या निमित्ताने तमाम हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमलाभवानी मंदिरात विश्वरत्न हजरत मोंहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्ताचे औचित्य साधून भाविकांना केळी व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे. ‌‌

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य ॲड राहुल सावंत, नगरसेवक संजय सावंत, अमीरशेठ तांबोळी, ॲड नईम काझी, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप, फारुख भाई जमादार, हाजी फारुख बेग, सुरज शेख, अशपाक पठाण,पिंटु बेग, जहाँ गीर बेग,यांच्या हस्ते संपन्न झाला.

याप्रसंगी श्री.कमलाभवानी मंदिर विश्वस्तांनी करमाळा मुस्लिम समाजचे या उपक्रमाबद्दल कौतुक व आभार व्यक्त केले. हिंदु व मुस्लिम बांधवांनी प्रत्येक सणाच्या निमित्ताने आपल्यातील बंधु भाव जपून धार्मिक एकोपा जोपासा वा व एक चांगला आदर्श समाजापुढे आणावा अशी प्रतिक्रिया श्री कमलाभवानी मंदिर विश्वस्तांनी व्यक्त केला.

यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मुस्लिम समाजातील व्यक्तीचे स्वागत केले, यावेळी समीर शेख,मजहर नालबंद, शोएब बेग, शाहरुख शेख व इतर मुस्लिम समाजातील बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक रहेनुमा चॅरिटेबल ट्रस्ट, मुस्लिम विकास परिषद, हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्ट, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा व करमाळा मुस्लिम समाज यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!