खासदार फंडातून करमाळा तालुक्यातील विविध गावात स्ट्रीट लाईट दिव्ये मंजूर - गणेश चिवटे - Saptahik Sandesh

खासदार फंडातून करमाळा तालुक्यातील विविध गावात स्ट्रीट लाईट दिव्ये मंजूर – गणेश चिवटे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : – सन 2021- 22 च्या खासदार फंडातून माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांनी करमाळा तालुक्यातील जातेगाव, मोरवड, खांबेवाडी, खडकी, कामोने, कुसकरवाडी, आवाटी ,निमगाव ह, नेरले, घारगाव, शेलगाव क, देवीचामाळ ,रायगाव ,लिंबेवाडी, राखवाडी, वाघमारे वस्ती, बिटरगाव श्री ,वंजारवाडी ,पिंपळवाडी , हिवरवाडी ,मिरगव्हाण ,करंजे ,पांडे ,वीट ,रोशेवाडी, देवळाली, खडकेवाडी,हिवरे या गावांमध्ये स्ट्रीट लाईट दिवे मंजूर झाले आहेत अशी माहिती भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी दिली.

याबाबत बोलताना गणेश चिवटे म्हणाले की, सन 2019 – 20 मध्ये कोरोना महामारीच्या काळात सर्व खासदार फंड हा आरोग्य विभागात खर्च करण्यात आला होता, त्यामुळे विकास कामांना खोडा निर्माण झाला ,परंतु येणाऱ्या काळात खासदार
रणजितसिंह नाईक- निंबाळकर व जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात राज्य सरकार व केंद्र सरकार यांचा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून तालुक्यात विविध विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!