करमाळा शहरातील पोथरे नाका येथील महात्मा गांधी पुतळ्यावर जयंती उत्साहात साजरी

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा – राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती चिंतामणी दादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या नेतृत्वात महात्मा गांधींच्या जयंती निमित्त गांधी पुतळ्यास मानवंदना देण्यात आली.

करमाळा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 153 वि जयंती करमाळा शहरातील पोथरे नाका येथील गांधी पुतळ्याजवळ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी करमाळा नगर पालिकेचे मा.नगरसेवक राहुल जगताप, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाउपाध्यक्ष दस्तगीर पठाण,तालुकाध्यक्ष जावेदभाई शेख, ओ.बी.सी विभागाचे तालुकाध्यक्ष गफुरभाई शेख,तालुका उपाध्यक्ष अशोक घरबुडे,सचिव जैनुदिन शेख,तालुका उपाध्यक्ष मुसा पठाण, रमजाण मुलाणी,सोमनाथ अवघडे,महंमद पठाण,हसन मुलाणी, हणुमंत पवार, आनंदभैय्या झोळ,निखिल शिंदे,नागेश ढाणे,गितेश लोकरे,गणेश फलफले,योगेश राखुंडे,जावेद शेख,अजहर पठाण,संदिप बिल्डर,नितीन चोपडे पृथ्वीराज जगताप,विश्वराज जगताप,अथर्वराज फाटके तसेच करमाळा तालुका काँग्रेसपार्टीचे पदाधिकारी,पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना मानवंदना देऊन राष्ट्रगीत गायन करण्यात आले. त्यानंतर स्व.नामदेवरावजी जगताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या उपस्थितीत १ क्विंटल फराळाचे वाटप व केळी वाटप कमलादेवीच्या भाविकभक्तांना करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!