यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती संपन्न - Saptahik Sandesh

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा – येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस महाविद्यालयाच्या डॉ.एल. बी. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे , कनिष्ठविभागाचे उपप्राचार्य , कॅप्टन संभाजी किर्दाक , लेफ्टनंट डॉ. विजया गायकवाड , ग्रंथपाल डॉ. सपनाराणी रामटेके , वरिष्ठ विभागातील प्राध्यापक , कनिष्ठ विभागातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!