मलवडी येथे अनेक महिलांनी केला प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश - Saptahik Sandesh

मलवडी येथे अनेक महिलांनी केला प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश

केम (प्रतिनिधी-संजय जाधव) : महात्मा गांधी जयंतीचे निमित्त साधून आज (दि.२) मलवडी येथे करमाळा तालुक्यातील अनेक महिलांनी महिला तालुकाध्यक्ष स्वातीताई गोरे व संघटक नामदेव पालवे यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी येणाऱ्या काळात करमाळा तालुक्यातील विधवा भगिनी असतील वृद्ध माता असतील अपंग असतील अन्यायग्रस्त भगिनी असतील सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात लढा उभा करणार असल्याचे सांगितले.

यावेळी करमाळा तालुक्याचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, युवा जिल्हा उपाध्यक्ष युनूस पठाण, संपर्कप्रमुख सागर पवार सरचिटणीस सोनू मखरे, युवा नेते दादा पालवे कृष्णा शिंदे, प्रवीण मत्रे, करमाळा तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीताई अजय सुरवसे, तालुका कार्याध्यक्ष वर्षाताई सलगर, तालुका संपर्कप्रमुख कविताताई पालवे,शाखाध्यक्ष सोमनाथ जाधव,अतुल गायकवाड सुरेखा देडगे,यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!