लीड स्कूलच्या बस ड्रायव्हरकडून रक्तदान

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ग्रामपंचायत देवीचामाळ व बुधभूषण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्याकडून नवरात्रानिमित्त श्री.कमलाभवानी मंदिरामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले, यामध्ये करमाळा शहरातील सीबीएससी मान्यता प्राप्त शाळा लीड स्कूलच्या विद्यार्थ्यांना वाहतूक करणाऱ्या बस ड्रायव्हर कडून रक्तदान करण्यात आले.
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या भावनेतून सर्वांनी उत्स्फूर्तपणे अनेकांनी रक्तदान केले आहे. रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतल्याबद्दल श्री कमला भवानी ब्लड सेंटर तर्फे सन्मानपत्र रक्तदात्यास देण्यात आले.

