राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा - Saptahik Sandesh

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करमाळा तालुका अध्यक्ष संतोष वारे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचे हस्ते त्यांचा सरकार मित्र मंडळा तर्फे वाढदिवस साजरा करून जय महाराष्ट्र चौकात सत्कार करण्यात आला.

यावेळी मोठ्या संख्येने युवकांची उपस्थिती होती. श्री. वारे यांचे वाढदिवसानिमित्त सरकार मित्र मंडळाने आमदार लंके यांना आमंत्रित केले होते. वारे हे सरकार मंडळाचे सदस्य आहेत. लंके यांची महात्मा गांधी पुतळ्यापासून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे वेगळेच जल्लोषमय वातावरण तयार झाले होते. लंके यांचे हस्ते सरकार मित्र मंडळाची गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर जय महाराष्ट्र चौकात केक कापून वारे यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी लंके यांनी वारे यांच्या सामाजिक कार्याचे कौतूक करून भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आमदार श्री.लंके यांनी सावंत गटाचे नेते सुनील सावंत, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप यांचे घरी भेट देवून गणपतीचे दर्शन घेतले. रात्री संतोष वारे यांचे घरी भोजन घेतले. या सर्व कार्यक्रमाने वारे यांची हवा झाल्याची चर्चा करमाळा शहरात चर्चिली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!