केम जवळ रेल्वे घसरली – दोन्ही इंजिन थेट गेले शेतात

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : केम (ता.करमाळा) येथील एका रेल्वे ट्रॅक वरील रेल्वेचे दोन्ही इंजिन व दोन डबे रेल्वे ट्रॅक सोडून अचानक घसरले, त्यामुळे एक रेल्वेलाईन बंद अवस्थेत आहे, रेल्वे अचानक घसरल्याने रेल्वेचे दोन्ही इंजिन थेट केम येथील शेतकरी रवी खाणट यांच्या शेतात गेली. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नसून रेल्वेरुळाचे मात्र नुकसान झाले. सोलापूर- पुणे हा दुहेरी रेल्वे ट्रॅक असून या ट्रॅक वरील एका ट्रॅकवरुन जाणारी रेल्वे काल (ता.३) रात्री केम जवळ घसरली व खाली गेली, परंतु रेल्वे विभागाने आज पहाटे पासूनच तातडीची यंत्रणा सज्ज करून क्रेनद्वारे हे रेल्वेचे दोन्ही इंजिन पुन्हा रेल्वे ट्रॅकवर लावण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत ही रेल्वे लाईन पूर्ववत होण्यासाठी थोडा कालावधी जाणार असल्याने एक रेल्वे ट्रॅक बंद असणार आहे. हा ट्रॅक बंद असल्यामुळे ठराविक गाड्यांच्या वेळेत बदल झाला होता.

Kem Railway accident | train went into farm | railway shetat geli | marathi news | karmala | saptahik Sandesh

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!