केम येथे स्व.शिवाजी तळेकर यांच्या पुतळ्याचे अनावरण
केम ( प्रतिनिधी संजय जाधव) : महात्मा फुले शिक्षण व समाज विकास मंडळ केम चे संस्थापक अध्यक्ष व खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शिवाजी बापू जनार्दन तळेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्राचार्य ह.भ.प. बाळासाहेब देहूकर व मकाई कारखान्याच्या संचालिका रश्मी बागल कोलते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तहसीलदार विजय तळेकर, माजी जि.प.सदस्य दिलीप दादा तळेकर, माजी संचालक गोरख जगदाळे, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रंगनाथ शिंदे, कुंकू कारखानदार मनोज सोलापूरे, महेश तळेकर डॉ मधुकर कुरडे, पै महावीर तळेकर बापुराव तळेकर, व्होटकर गुरूजी रोपळै विदयालयाचे प्रचार्य दळवी सर आदि उपस्थित होते