गणेशजयंती निमित्त गजानन सोशल अँड स्पोर्टस् क्लब तर्फे करमाळा शहरात उद्या महाप्रसादाचे आयोजन - Saptahik Sandesh

गणेशजयंती निमित्त गजानन सोशल अँड स्पोर्टस् क्लब तर्फे करमाळा शहरात उद्या महाप्रसादाचे आयोजन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे याहीवर्षी गणेश जयंतीनिमित्त करमाळा शहरातील गजानन सोशल ॲन्ड स्पोर्टस् क्लबच्या वतीने १३ फेब्रुवारीला सहस्त्र आवर्तन व गणेशयाग सोहळा तसेच सायंकाळी ६ ते १० पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम करमाळा शहरातील वेताळपेठ येथे होणार आहे. तरी सहकुटूंब सहपरिवार येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा; असे आवाहन गजानन सोशल ॲन्ड स्पोर्टस् क्लबचे संस्थापक/अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!