ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामध्ये विजय खंडागळे यांना ‘उत्कृष्ट कवी पुरस्कार’ प्रदान
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या १८ व्या अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामध्ये गौंडरे(ता.करमाळा) येथील कवी विजय खंडागळे यांनी पर्यावरणाचा संदेश देणारी उत्कृष्ट कविता सादर केल्याबद्दल त्यांना ‘उत्कृष्ट कवी’ म्हणून सन्मानित करण्यात आले.
खंडागळे यांनी वृक्षारोपणाचे महत्व आपल्या कवितेतून मांडले. खंडागळे यांनी गावातील युवकांना बरोबर घेऊन ‘वसुंधरा परिवार’ या ग्रुपची स्थापना केली असून या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी वृक्षारोपणाचे कार्य हाती घेतले आहे. गावातील धार्मिक, सामाजिक कार्यक्रमामध्ये आलेल्या पाहुण्यांना वृक्ष भेट देणे तसेच त्यांच्या हस्ते वृक्षारोपण केले जाते.
विजय खंडागळे हे संगीत विशारद असून त्यांनी अनेक गीते स्वतः रचून त्यांना चाली दिलेल्या आहेत. गौंडरे गावातील भजन कीर्तन या सारख्या धार्मिक कार्यक्रमामध्ये त्यांचा नेहमी पुढाकार असतो.