ज्येष्ठ विधीज्ञ एन.डी.रोकडे यांचा सोलापूर येथील “वकील परिषदेत” विधी व्यवसायातील ‘दिग्गज विधीज्ञ’ म्हणून सत्कार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा वकील संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ विधीज्ञ एन.डी. रोकडे यांचा महाराष्ट्र गोवा बार कौन्सीलच्या सोलापूर येथे झालेल्या वकील परिषदेत विधी व्यवसायातील दिग्गज विधीज्ञ म्हणून सत्कार करण्यात आला.
हा सत्कार सोलापूर येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात बार कौन्सील ऑफ इंडियाचे अध्यक्ष मिलींद थोबडे व श्री.मिश्रा यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी न्यायमुर्ती जमादार, न्या. दीपशंकर दत्ता, न्या. कर्णिक, न्या. विनय जोशी आदी उपस्थित होते.
ॲड.एन.डी.रोकडे हे जवळपास ४८ वर्षे झाली करमाळा न्यायालयात आपला वकिली व्यवसाय करीत आहेत, जुन्या काळी त्यांनी अनेक गोरगरीब पक्षकारांची कधीही फि घेतली नाही, सामाजिक कार्य समजून न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी अनेक सामाजिक कार्यात कायदेशीर बाजू मांडत आपले सामाजिक कार्य जोपासले आहे. त्यांना ४८ वर्षांचा वकिलीचा अनुभव असल्याने अनेक नवोदित वकील त्यांचे मार्गदर्शन आजही घेतात, इतक्या वर्षांचा अनुभव व केलेला व्यवसाय यामुळे ज्येष्ठ विधीज्ञ एन.डी. रोकडे यांचा महाराष्ट्र गोवा बार कौन्सीलच्या सोलापूर येथे झालेल्या वकील परिषदेत विधी व्यवसायातील दिग्गज विधीज्ञ म्हणून सत्कार करण्यात आला.

