सुजान नागरिकांनी व सर्व पक्ष संघटनांनी या "भारत जोडो" यात्रेस पाठींबा दिला पाहिजे - ललित बाबर - Saptahik Sandesh

सुजान नागरिकांनी व सर्व पक्ष संघटनांनी या “भारत जोडो” यात्रेस पाठींबा दिला पाहिजे – ललित बाबर

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.५) : देशातील लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी सर्व सुजान नागरिकानी व सर्व पक्ष संघटनांनी या भारत जोडो भारत जोडो यात्रेस पाठींबा दिला पाहिजे असे स्वराज इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष ललित बाबर यांनी म्हटले आहे.

भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ काढलेल्या नफरत छोडो भारत जोडो संविधान बचाओ यात्रेच्या करमाळा येथील स्वागत कार्यक्रमात बोलत होते. ललित बाबर पुढे म्हणाले की, सध्या देशात दोनच पक्ष आहेत एक भारत तोडण्यास निघालेला व दुसरा भारत जोडण्यास निघालेला आम्ही भारत जोडणा-यांच्या बाजूने आहोत. आपणही भारत जोडणा-यांच्या बाजूने भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे. सदर कार्यक्रमाचे आयोजन सुनील सावंत व ॲड.सविता शिंदे यांनी केले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील सावंत यांनी केले या प्रसंगी ते म्हणाले की, आज देशाला भारत जोडो यात्रे सारख्या उपक्रमाची गरज आहे. स्वराज इंडिया व इतर जनसंघटनांनी भरत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ कोल्हापूर ते देगलुर आयोजित केलेली हि यात्रा हा उप्रकम स्तुत्य उपक्रम आहे. यास आमच्या सक्रीय शुभेच्छा आहेत.

या प्रसंगी ॲड. सविता शिंदे म्हणाल्या की, देशातील सध्याच्या सत्ताधा-यांनी सर्व संविधानात्मक संस्था ताब्यात घेतल्या असून संविधानाची मोडतोड चालविलेली आहे. तसेच लोकशाही मुल्ये पायदळी तुडविण्याचे काम हे सत्ताधारी करीत आहेत. त्या विरोधात आवाज उठविण्याचे काम राहुल गांधीनी भारत जोडो यात्रे द्वारे चालू केलेले आहे. त्यामुळे सदर यात्रेस आमचा पाठींबा आहे.याप्रसंगी ‌सचिन काळे, प्रा संजय चौधरी यांचेही भाषण झाले.

यावेळी नगरसेवक संजय सावंत, फारुक जमादार रविन्द्र काऺबळे फारुक बेग देवा लो॓ढे अकबर बेग, ॲड. ढेरे, च॑द्रका॑त मुसळे समीर शेख़ साजीद बेग आन॑द रोड़े आलीम खान महमद बागवान आजीनाथ शि॑दे खलील मुलाणी नागेश उबाळे गोविंद किरवे सिकंदर फकीर शुभम बनकर सुनिल अंधारे रमेश हवालदार मैनुद्दीन शेख अशोक सावंत बापु घोलप समाधान सुरवसे मार्तंड सुरवसे पंढरीनाथ नलवडे सय्यदा पत्रकार मनोज राखुडे हरीभाऊ क्षीरसागर पप्पू रंदवे चंदु मुसळे आदी जण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!