मुख्यमंत्री फेलोशिप अंतर्गत तरुणांना प्रशासकीय अनुभव मिळविण्याची संधी - Saptahik Sandesh

मुख्यमंत्री फेलोशिप अंतर्गत तरुणांना प्रशासकीय अनुभव मिळविण्याची संधी

करमाळा(दि.७) :राज्यातील तरुणांना सरकारी प्रशासकीय कामकाजाचा अनुभव मिळावा या हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा पुन्हा सुरू करण्यात आला आहे.  फडणवीस यांनी शनिवारी एक्स वरून या कार्यक्रमाची घोषणा केली.

मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रमांतर्गत राज्यातील 60 तरुणांची निवड करण्यात येणार असून त्यांना एक वर्षासाठी जिल्हाधिकारी वा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधीन महत्वाची जबाबदारी दिली जाईल. तरुणांना प्रशासनाबरोबर थेट काम करण्याचा अनुभव मिळावा त्यांच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या कक्षा विस्ताराव्यात तसेच त्यांच्या कल्पकतेचा तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाचा उपयोग प्रशासनाला व्हावा यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयामार्फत मार्फत होणार आहे.

पात्रता व निवड

  • फेलोशिपचा कालावधी – १२ महिने
  • वयोमर्यादा – २१ ते २६ वर्ष
  • अर्ज प्रक्रिया – mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लवकरच सुरू होणार आहे.
  • अर्ज शुल्क पाचशे रुपये असेल
  • कोणत्याही शाखेतील किमान 60 टक्के गुणांसह पदवी व एक वर्षाचा अनुभव
  • मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि संगणक हाताळणीची कौशल्य आवश्यक
  • निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी,निबंध लेखन आणि मुलाखत हे तीन टप्पे असणार आहेत.
  • फेलोशिप मिळणाऱ्यांना एकूण ६१ हजार ५०० रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!