शेताच्या बांधावरून मोटारसायकलची चोरी

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : शेताच्या बांधावर लावलेली मोटारसायकलची चोरी झाली आहे. हा प्रकार २६ मे ला सकाळी साडेसात ते दुपारी साडेबाराच्या सुमारास पारेवाडी येथे घडला आहे.

या प्रकरणी गणेश बबन शिंदे रा.पारेवाडी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की संतोष अशोक शिंदे रा.पारेवाडी यांच्या शेतात २६ एप्रिलला सकाळी साडेसात वाजता केळीच्या पिकाची लागवड करण्यासाठी गेलो होतो.

त्यावेळी माझ्या मालकीची मोटार सायकल क्र. एमएच ४५ एके ४३६२ ही बांधावर लावली होती. काम संपवून साडेबारा वाजता बांधावर आलो असता सदरची मोटारसायकल चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!