झोपलेल्या व्यक्तीला काठीने मारून पाय मोडला - मोरवड मधील प्रकार - Saptahik Sandesh

झोपलेल्या व्यक्तीला काठीने मारून पाय मोडला – मोरवड मधील प्रकार

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा ता. २२ : झोपलेल्या व्यक्तीला काठीने मारून पाय मोडल्याचा प्रकार मोरवड येथे १७ सप्टेंबर च्या पहाटे १-३० वाजता घडला आहे.

या प्रकरणी छगण बापु कुदळे (रा. मोरवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले, की मोटरीची रात्रीची लाईट असल्याने दरवाजा उघडा ठेवून मी व माझी आई घरात झोपलो होतो. पहाटे १-३० वाजता कोणीतरी अज्ञान व्यक्तीने लाकडी काठीने माझ्या पायावर जोरदार हल्ला केला असून, माझे पाय त्यात फ्रॅक्चर झाला आहे. मी ओरडल्यावर आई जागी झाली. ती ओरडल्यावर त्याने आईच्या पाठीत दगड मारला आहे. त्यानंतर रात्रीच करमाळा येऊन डॉ. शिंदे यांच्या हॉस्पीटलमध्ये दाखल झालो आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!